डावखुऱ्या फलंदाजाना बाद करण्याच्या यशाचे गुपीत आर आश्विनकडुन उघड, म्हणाला

R Ashwin

मुंबई : आयसीसीच्या पहिल्या वहिल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला अवघे ४ दिवस बाकी आहेत. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही संघ इंग्लंडमध्ये असुन पुर्णपणे तयार झाले आहेत. या सामन्यात आर अश्विनच्या कामगीरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद केले आहे. यातील २०० वेळा त्याने डावखुऱ्या फलंदाजाना बाद केले आहे. अशी कामगीरी करणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज आहे. त्याच्या या यशामागे असलेली रणनितीचा खुलासा त्याने नुकत्याच एका मुलाखतीत केला. यावेळी तो म्हणाला,’जेव्हा मी डावखुऱ्या फलंदाजाना गोलंदाजी करतो तेव्हा मी त्यांच्या बॅटचे दोन्ही किनारे लक्ष्य करत असतो. फलंदाजाना बाद करण्यासाठी स्लीप, शॉर्ट लेग आणि सिली पॉँइंटवर क्षेत्ररक्षक उभा करतो. या क्षेत्ररक्षणामुळे फलंदाजाना खेळण्यास अडचण होते. तसेच यष्टीच्या दिशेने गोलंदाजी करत असल्यमुले फलंदाजाना खेळण्याशिवाय काही पर्याय उरत नाही.’

यावेळी बोलताना त्याने आगामी डब्ल्युटीसी अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी संघ न्युझीलंडचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की किवीचा संघ हा उत्कृष्ट आहे. अंतिम सामन्यापुर्वी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमुळे त्यांना चांगला सराव मिळाला आहे. मात्र आमच्यापुढे परिस्थीतीशी जुळवुन घेण्याचे आवाहन असणार आहे. न्यूझीलंड संघातील सलामीवीर टॉम लेथम, डेवोन कॉनवे आणि हेनरी निकोल्स हे डाव्या हाताचे फलंदाज आहेत. यांच्याविरुद्ध अश्विन कशी गोलंदाजी करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP