fbpx

राफेलचे रहस्य पर्रीकरांच्या बेडरूम मध्ये – कॉंग्रेस

टीम महाराष्ट्र देशा : सतत चर्चेत असलेल्या राफेल डील घोटाळ्याच्या प्रकरणाला कॉंग्रेस पक्षाकडून पुन्हा एक नवीन मुद्दा शोधण्यात आला आहे. या शोधमोहिमे मध्ये गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित स्वरुपात एक ऑडिओ क्लिप कॉंग्रेसच्या हाताला लागली आहे. या ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी मनोहर पर्रीकरांच्या बेडरूम मध्ये राफेलचे रहस्य दडले असल्याचा आरोप भाजप सरकार वर केला आहे.

कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेल प्रकरणावरून पुन्हा एकदा लक्ष्य केले. यावेळी सुरजेवाला यांच्याकडून राफेल घोटाळ्या बाबतची सर्व रहस्य भारताचे पूर्वसंरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बेडरूम मध्ये असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच राफेल डील संदर्भातील अजून कोणती रहस्य पर्रीकरांच्या खोलीत बंद करुन ठेवण्यात आली आहेत?,असा प्रश्नही त्यांनी मोदी सरकारला केला आहे.