‘द फॅमिली मॅन’ दुसरा सीझन या दिवशी रिलीज होण्याची शक्यता

द फॅमिली मॅन

मुंबई : अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरील वेब सिरीज ‘द फॅमिली मॅन’ चा पहिला सीझन २० सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झाला. त्यानंतर या वेब सिरीजच्या दुसऱ्या भागविषयी अनेकांच्या उत्सुकता दाटल्या आहेत. यापूर्वी ‘द फॅमिली मॅन’चा दुसरा सीझन प्रथम १२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता, परंतु तांडव सीरिजवरून झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम थांबविण्यात आला. त्यानंतर या सीरिजचा दुसरा सीझन मे महिन्यात येणार असल्याच्या बातम्या आल्या. परंतु आता पुन्हा एकदा पुढील महिन्यात ‘द फॅमिली मॅन सीझन २’ प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, अद्याप या सीरिजची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, परंतु अ‍ॅमेझॉन प्राइमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर यासंदर्भात गोंधळ सुरू झाला आहे. गुरुवारी प्राईम व्हिडिओने ‘फॅमिली मॅन’ची काही छायाचित्रे पोस्ट केली. दुसर्‍या सीझनची आतुरतेने वाट पाहात असल्याने अनेकांना याची तारीख जाणून घ्याचीय आहे. त्याच वेळी, लेट्स ओटीटीने ट्विटरवर दावा केला आहे की, द फॅमिली मॅनचा दुसरा सीझन ११ जून रोजी येऊ शकतो. त्यात म्हटले आहे की, हिंदी, तामिळ, तेलगू आणि इंग्रजी भाषांमध्ये डबिंगचे काम पूर्ण झाले असून सीझन २ सर्व भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होईल.

दुसरीकडे, पहिल्या सीझनमध्ये मनोज बाजपेयी यांच्या टीम ऑफिसरच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता सनी हिदुजाने जागरण डॉट कॉमशी बोलताना सांगितले की, दुसऱ्या सत्रातील अधिकृत माहिती लवकरचं येण्याची शक्यता आहे. या गुप्तचर थ्रिलर मालिकेत मनोज बाजपेयी टी.ए.एस.सी. या गुप्तहेर संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक श्रीकांत तिवारी यांची भूमिका साकारली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP