‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

city of dreams 2

मुंबई : गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मनोरंजन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. या नुकसानातून मार्ग काढण्यासाठी काही कलाकार आणि निर्माते ओटीटीकडे वळाले. यात मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले.

मराठी कलाकारांनी ओटीटीवर केलेल्या पदार्पणापैकी दोन वेब सिरीजला जास्त पंसती मिळाली. पहिली म्हणजे समांतर आणि दुसरी सिटी ऑफ ड्रिम्स या दोन्ही वेब सिरीजने मराठी तसेच हिंदीतही नाव कमावले, यात समांतरचा दुसरा भाग काही दिवसापुर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र सिटी ऑफ ड्रिम्सच्या पुढील भागाची प्रेक्षकांना प्रतिक्षा होती. मात्र आता ही प्रतिक्षा संपली आहे. येत्या ३० जुलै रोजी सिटी ऑफ ड्रिम्सचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागातील कथानक या भागात पुढे जाताना दाखवले आहे. यात मुलगी आणि बाप दोघांत सत्तेच्या लालसापोटी सुरु असलेला संघर्ष हा या भागाच्या कथेचा मुख्य धागा आहे.

सिटी ऑफ ड्रिम्समध्ये मुख्य भूमिकेत असणाऱ्या प्रिया बापटने काही दिवसापुर्वीच या वेब सिरीजचा ट्रेलर सोशल मीडीयावर पोस्ट करत ही माहिती दिली. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर दुसऱ्या भागाची प्रतिक्षा प्रेक्षकांना होती. येत्या ३० जुलै पासुन ही वेब सिरीज प्रेक्षकांना डिस्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सिटी ऑफ ड्रिम्समध्ये प्रिया बापट व्यतिरिक्त सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी, संदीप कुलकर्णी या कलाकाराच्या मुख्य भूमिका आहेत. तर या सिरीजचे दिग्दर्शन नागेश कुक्कुनुर यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या