‘या’ ठिकाणी दुसऱ्यांदा अतिक्रमणाचा प्रयत्न, मनपाच्या अतिक्रमण विभागाने हाणून पाडला!

औरंगाबाद : नंदनवन कॉलनी परिसरातील बिल्डर हाऊसिंग सोसायटीजवळ असलेल्या खुल्या जागेवरील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने हाणून पाडण्यात आला. सोमवारी (दि.१४) सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकातर्फे या खुल्या जागेवर अतिक्रमणाचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करत साहित्य जप्त केले. याठिकाणी याआधी देखील कारवाई करण्यात आली होती. मात्र येथे पुन्हा अतिक्रमणाचा प्रयत्न झाला.

यापूर्वीच कारवाई करण्यात आली होती. बिल्डर हाउसिंग सोसायटी रेखांकनाची सदर खुली जागा असून याठिकाणी आज पुन्हा पत्रे व लोखंडी अँगल लावून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू होता. याबाबत  प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांनी पूर्ण ताफ्यानिशी याठिकाणी होणाऱ्या अतिक्रमनाचा प्रयत्न हाणून पाडला.

याशिवाय पहाडसिंगपुरा रोडलगत साईबाबा मंदिराजवळ पुंड यांनी याठिकाणी वाहणाऱ्या नाल्यात आरसीसी मध्ये कॉलम टाकून भिंत बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. बांधकाम बंद पाडून हे किरकोळ स्वरूपाचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच पुंड हे याच भागात बारा हजार स्क्वेअर फूट जागेत आरसीसीचे काम करत आहे. हे काम सुद्धा बंद करून त्यांना मालकी हक्क व बांधकाम परवानगी बाबत नोटिस व तीन दिवस मुदतीची नोटीस देण्यात आली आहे. सदर कारवाई प्रशासक यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

महत्त्वाच्या बातम्या