मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा नेहमीच मोठा असतो ; श्रीनिवासांच्या पोलीस चौकशीवर राहुल गांधी आक्रमक

rahul gandhi

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.

या काळातही काही लोकं झोकून देऊन सर्वसामान्य नागरिकांना मदत करत होते. यातीलच देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चिलं गेलेलं नाव म्हणजे युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. मात्र, याच मदतीमुळे आता दिल्ली पोलिसांनी त्यांची चौकशी केली आहे. जवळपास 20 मिनिटं ही चौकशी झाली. यानंतर काँग्रेस आक्रमक झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मारणाऱ्या पेक्षा जीव वाचवणारा मोठा असतो असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने श्रीनिवास यांची चौकशी केली आहे. ही चौकशी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच झाल्याचे सांगितलं जात आहे. परंतु यामुळे आता कॉंग्रेस च्या विविध नेत्यांनी प्रतिक्रिया देऊन भाजप आणि मोदी सरकारवर आता हल्लाबोल चढवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP