”राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जातील . ‘ महाजनांचा ठाकरेंना टोला

टीम महाराष्ट्र देशा : ”राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जातील . ” अशा शब्दात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेवरून उद्धव ठाकरेंना टोला मारला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी विकासाची अनेक आश्वासने देत आहेत. पत्रकार परिषदेदरम्यान संवाद साधताना महाजन यांनी ठाकरे यांना चिमटा काढला आहे.

संगमनेरमध्ये प्रचारसभेदरम्यान बोलताना ठाकरे यांनी ”निवडणूका झाल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी, त्याचबरोबर १० हजार रुपये मदत करण्याची घोषणा ठाकरे यांनी केली. त्यावर ”ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जातील.” असे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना-भाजपाची युती असली तरी निवडणुकीला सामोरे जात असतानाही अद्यापही दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करताना पाहायला मिळत आहे.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महाजन म्हणाले की, ” इतके वर्ष राज्य केले, तरी जनतेच्या मनात काय आहे ते तुम्हाला ओळखता आले नाही. आम्ही ते ओळखले म्हणून किती जागा येतील हे सांगू शकतो. असा टोलाहि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे हे प्रत्येक सभेत शेतकऱ्यांना कर्जमाफीच नाही तर कर्जमुक्तीच आश्वासन देत आहे. दसरा मेळाव्यातही त्यानी गरिबांना १० रुपयात थाळी अन् १ रुपयात आरोग्य तपासणी करण्याचंही आश्वासन दिलं. त्यामुळे कुठेतरी शिवसेनेच्या वचननाम्यावर भाजपा नेतेही नाराज असून युतीत सर्व काही आलबेल नाही असाच दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :