एका हातात भगवा झेंडा आणि दुसऱ्या हाता धोंडा घेत शिशिर शिंदे स्वगृही

shishir shinde

मुंबई : मनसेचे माजी आमदार आणि नेते शिशिर शिंदे यांनी अखेर मनसेला सोड चिट्टी देत,शिवसेनेत प्रवेश केला. आज मुंबईतील गोरेगाव येथे शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिशिर शिंदे शिवबंधनात बांधले गेले.

काही दिवसांपूर्वीच मनसेच्या कार्यकारिणीमध्ये शिशिर शिंदे यांना डावलण्यात आले होते. यानंतर ते मनसे राहणार कि शिवसेनेत प्रवेश करणार,या चर्चांना उधान आले होते. या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिशिर शिंदे अखेर आपल्या स्वगृही परत आले आहेत.

शिशिर शिंदे म्हणाले,गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही क्लीप व्हायरल होत आहेत. पण त्याबद्दल शिवसैनिकांची कान धरून माफी मागतो असं म्हणत आपल्याला माफ करावं वयाच्या सतराव्या वर्षी शिवसेनेत दाखल झालो होतो तेव्हा एका हाती झेंडा आणि एका हातात धोंडा घेतला होता. जेव्हा उद्धव ठाकरेंची भेट घेतली ती खूप भावनिक होती. उद्धव ठाकरेंचा हात हातात घेतला तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंचा भास झाला आता हातात भगवा झेंडा आणि दुसऱ्या हाता धोंडा घेऊन कामाला लागणार आहे.