ग्रामविकासाच्या योजना सरपंचांना ‘सोशल मिडिया’द्वारे कळविणार – पंकजा मुंडे

रत्नागिरी: ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आयोजित केलेल्या सरपंच दरबारात राज्यातील सरपंचांकडून गावाच्या विकासाबाबतचे मत जाणून घेतले. सरपंच मानधनासह, गावच्या विविध समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. समाज माध्यमातून सर्व सरपंचांना ग्रामविकास विभागाच्या विविध योजना व अद्ययावत माहिती तत्काळ पोहोचविली जाईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्र्यांनी दिले आहे. या दरबारात रत्नागिरी जिल्ह्यातून सहभागी झालेले चिपळूण तालुक्यातील नायशीचे सरपंच किशोर घाग यांनी ही माहिती दिली.

मुंबईत मंत्रालयातील परिषद सभागृहात आयोजित सरपंच दरबारात राज्यभरातून विविध जिल्ह्यांतील सरपंचानी हजेरी लावली होती. त्यांना मार्गदर्शन करताना ग्रामविकास मंत्री मुंडे म्हणाल्या, राज्यातील गावांमध्ये पाणी योजना अपूर्ण आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याबरोबर नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान बैठक घेऊन मार्ग काढला जाईल. प्रथमच निवडून आलेल्या तरुण सरपंचांची संख्या मोठी आहे. त्यांना गावांच्या विकासाबद्दल आणि शासनाच्या विविध योजनांविषयी प्रशिक्षण देण्यात येईल.

Loading...

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सरपंचासाठी वेळ राखून ठेवणार आहे. राज्यातील सरपंचांशी समाज माध्यमातू थेट संपर्क साधला जाईल. शासनाच्या विविध निर्णयांचा अभ्यास करून शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार आदींचा निधी आणण्यासाठी पाठपुरावा करून नियोजनपूर्वक कामे केली तर गाव विकासाला त्याची मदत होणार आहे.

सरपंचांनी केवळ योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. नागरिकांना लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे गावातच मिळण्याची व्यवस्था यापूर्वीच करण्यात आलेली आहे. विविध विकासकामे करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून सरपंचांनी याचा गांभीर्याने विचार करावा. सरपंचांनी गावाच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावे, असे आवाहन करून गाव हागणदारीमुक्त, सांडपाणीमुक्त आणि पाणंदमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्र्यांनी केले.

प्रत्येक गावात ग्रामसचिवालय सरपंच हा ग्रामविकासाचा पाया मजबूत करणारा महत्त्वाचा घटक असल्याने त्याच्याकडून गावाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. गावात उत्पन्न वाढविण्यासाठी बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल बांधण्यासाठी परवानगी देता येणार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या योजनेअंतर्गत गावात ग्रामसचिवालय बांधण्यात येणार आहे. ज्यामध्ये गावातील तलाठी, ग्रामसेवक यांच्या कार्यालयासह इतर कार्यालये एकत्रित असतील, असेही मुंडे यांनी सांगितले.

यावेळी सरपंचांनी विविध समस्या मांडल्या. पाणीपुरवठा योजनांसाठी निधी, सरपंचांना ओळखपत्र, मानधन वाढ, विविध योजनांचे प्रस्ताव मंजूर होण्यास होणारा विलंब आदींचा त्यात समावेश होता.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!