सत्ताधारी पक्षच जाणीवपूर्वक सभागृहाचे कामकाज बंद पाडतात

ajit pawar

मुंबई: गेल्या आठवड्या पासून महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली आहे. दरम्यान, सभागृह नीट चालवून जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणं ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे याची जाणीव आम्ही अध्यक्षांना करून दिली आणि सत्ताधारी पक्षाला स्पष्ट सूचना देण्याची विनंती केली. असेच सुरू राहिले तर राज्यपाल महोदयांकडे जाण्याचा विचार विरोधी पक्ष करत आहेत असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आज शिवसेनेने प्रशांत परिचारक याचं निलंबन मागे घेण्यावरून सभागृहात काही कालावधी साठी कामकाज बंद पाडलं. तसेच विरोधी पक्षांकडून सत्ताधारीभाजपची सतत कोंडी होत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्हाला विविध विषयांवर चर्चा करायची आहे, राज्यपालांच्या अभिभाषणावर मत मांडायचे आहे. मात्र या प्रमुख विषयांना फाटा देण्यासाठी सत्ताधारी पक्षच जाणीवपूर्वक सभागृहाचे कामकाज बंद पाडत आहेत.