राज्यकर्त्यांना देशाची फाळणी करायचीये; उदयनराजेंचा गंभीर आरोप

udayanraje bhosale

पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जून रोजी रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी छत्रपती यांची बहुप्रतिक्षीत भेट काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांच्या आधीच ठरलेल्या काही कार्यक्रमांमुळे होऊ शकली नव्हती. त्यामुळे राज्यभरात उलट-सुलट चर्चांना उधान आले होते. मात्र, आज ( १४ जून ) पुण्यात हे दोन्ही राजे भेटले आहेत. या भेटीकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष्य लागलं होतं.

या भेटीनंतर संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी एकत्रच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उदयनराजेंचा पारा चांगलाच तापलेला पाहायला मिळाला. त्यांनी केंद्र सरकारसह राज्यातील सत्ताधारी तसेच सर्व आमदार-खासदार यांच्यावर सडकून टीका केली. देशातील असो वा राज्यातील या राज्यकर्त्यांना देशाची फाळणी करायची आहे. हा माझा आरोप नाही, तर हे माझं ठाम मत आहे. असा गंभीर आरोप उदयनराजे यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘आपण जात कधी पाहिलेली नाही, पण आता तर लहानपणाचे मित्रदेखील अंतर ठेवून बोलतात. ही फळी कोण निर्माण करत आहे, तर ते राज्यकर्ते करत आहेत. समाजाचा याच्याशी काही संबंध नाही. आरक्षण द्यायची इच्छाच नसून राजकारण करायचं आहे. व्यक्तीकेंद्रीत राजकारण सुरु असून उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील. त्यावेळी आम्हीदेखील थांबवू शकणार नाही. आम्ही आडवे आलो तर आमच्यावरही हल्ला करायला थांबणार ते नाहीत. अशी वेळ येऊ देऊ नका, पण ही वेळ येणार आहे,’ असा इशाराच उदयनराजे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP