सुरक्षारक्षकांच्या डोळ्यात चटणी फेकून एटीएमचे पैसे नेणाऱ्या व्हॅनची लूट

crime-1

सोलापूर- एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जाणारी व्हॅन दरोडेखोरांनी लुटली आहे. सुरक्षारक्षकांच्या डोळ्यात चटणी टाकून ७० लाख रुपयांची रक्कम लुटल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील मेथवडे फाट्याजवळ घडली आहे.बँक ऑफ इंडियाची व्हॅन सांगोला तालुक्यातील एटीएम सेंटरमध्ये पैसे भरण्यासाठी पंढरपूरहून निघालेली होती. ही गाडी सांगोला तालुक्यातील मेथवडे फाट्याजवळ आली असता, दरोडेखोरांनी बेलेरो गाडी पैसे घेऊन जाणाऱ्या व्हॅनच्या समोर आडवी लावली. यानंतर गाडीत असलेल्या सुरक्षारक्षकांच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण करुन गाडीतील ७० लाख रुपये लुटले. रक्कम लुटल्यानंतर दरोडेखोर पंढरपूरच्या दिशने पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. चोरट्यांच्या तपासासाठी पथक तैनात करण्यात आली आहेत.Loading…


Loading…

Loading...