भाजपा मुळे शेतकऱ्यांना मताचा हक्क – गणेश चिवटे

करमाळा– भारतीय जनता पार्टी व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळेच आज कृषी उत्पन्न बाजार समिति सारख्या शेतकरी हिताच्या संस्थेच्या निवडणुकीत सहभाग नोंदवता येणार आहे, तेव्हा शेतकरी बंधुनी आपल्या मताचा योग्य वापर करुन भाजप- संजय शिंदे गटाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन भाजपा चे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी शेतकरी मतदारांना केले आहे.
संजय शिंदे भाजपा युतीचे हिसरे गणाचे उमेदवार दिपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ हिवरे येथे आयोजीत केलेेल्या सभेत ते बोलत होते

कृषी उत्पन्न बाजार समिति ची निवडणुक रणधुमाळी सुरु असुन या निवडणुकीत विद्यमान आमदार नारायण पाटील, विद्यमान सभापती व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या गटाने युती केली आहे तर बागल गट स्वतंत्र पणे सामोरे गेला आहे भाजपा व संजय शिंदे यांनी युती करुन प्रचार सुरु केला आहे.
या वेळी अधिक बोलताना चिवटे म्हणाले की तीस वर्ष बाजार समितीची सत्ता ताब्यात असताना जगताप यांना म्हणावा तितका विकास साधता आला नाही, या ठिकाणी जनावारांचा बाजार भरत नाही, शेतकर्यांचा भाजिपाला जास्त दिवस सुरक्षित ठेवण्यासाठी शितग्रह नाही, शेतकऱ्यांना अल्प दरात भोजनालय नाही, शेतकरी निवास नाही, तसेच मनामानी कारभार सुरु असतो हे थांबवण्यासाठी शिंदे भाजपा युतीचे उमेदवार विजयी करण्याचे अवहान त्यांनी केले.

या वेळी आदिनाथ चेअरमन तात्यासाहेब मस्कर, माजी संचालक बाळासाहेब जगदाळे, दत्तात्रय जगदाळे,कन्हैयालाल देवी भाजप तालुका अध्यक्ष गणेश चिवटे अरुण शिंदे, शशीकांत पवार
पै अफसर जाधव माजी नगरसेवक किरण बोकण माजी जिल्हा परिषद सदस्य नाना निळ भाजपा तालुका उपाध्यक्ष सचिन क्षिरसागर माढा पंचायत समिति सदस्य धनराज शिंदे भगवान गिरी, हिसरे गणाचे उमेदवार दिपक चव्हाण, धंनजय फरतडे, रावसाहेब पाटील, जयराम शिंदे, अरुण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते

You might also like
Comments
Loading...