थेट सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याचा अधिकार लोकशाहीसाठी घातक- अजित पवार

नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयकावर चर्चा झाली. यावेळी या विधेयेकात सुधारणा करण्याची मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार यांनी सरकारच्या या विधेयकावर नाराजी व्यक्त करत थेट सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय लोकशाहीला घातक असल्याच मत व्यक्त केल आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि सरपंच यांची निवड थेट जनतेतून झाली आहे. या निवडणुकींत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला होता तर राज्यात सर्वात जास्त सरपंच आणि नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले होते.

You might also like
Comments
Loading...