fbpx

महसूलमंत्री दिसेल त्याला भाजपात येण्याचे आमंत्रण देतात : जयंत पाटील

Jayant patil

सांगली : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे दिसेल त्याला भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आमंत्रण देत आहेत. असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथे झालेल्या सभेत लगावला आहे.

काही दिवासंपुर्वी सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे झालेल्या एका कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हुतात्मा उद्योग समूहाचे वैभव नायकवडी यांना भाजपात येण्याचे आवाहन केले होते. त्याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महसूलमंत्र्याला टोला लगावला. यावेळी ते म्हणले की, “चंद्रकांतदादांनी कोणाला तरी पक्षात येण्याचे आमंत्रण दिल्याचे कळले आहे. दादा दिसेल त्याला पक्षात बोलवित असतात”.

यावेळी जयंत पाटील यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादावरून दोन्ही पक्षावर टीका केली. ज्या पक्षाने २०-२५ वर्षे साथ दिली, त्या शिवसेनेला भाजपा अध्यक्ष अमित शहा उखडून टाकण्याची भाषा करीत आहेत. आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर भाजपा सरकारचा पाठींबा काढून घेतला असता. त्यांचे वारस असा स्वाभिमान दाखविणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला.