भारतीय जवानांनी घेतला बदला, पाकिस्तानच्या दोन जवानांचा खात्मा

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीर मध्ये काही दिवसांपूर्वी नियंत्रण रेषेजवळ दोन वेगवेगळ्या स्फोटांमध्ये भारताचे दोन जवान शहीद झाले होते. तर महाराष्ट्राच्या कौस्तुभ राणेंसह तीन जवानांनी चकमकीत हौतात्म्य पत्कले होते. तंगधार क्षेत्रामध्ये काल रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये पाकचे दोन सैनिक ठार झाले. सर्जिकल स्ट्राईकनंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेली ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे.

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मिळावी यासाठी जोरदार गोळीबार केला जात होता. यामध्ये अनेक जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले आहे. दरम्यान भारतीय जवानांनी काल रात्री दोन पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आहे. पाककडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात होते. याचा बदला घेण्यासाठी जवानांनी हे पाऊल उचलले असल्याचे वृत्त आहे.

हिना गावित हल्ला प्रकरण : दलित- आदिवासी संघर्ष समितीतर्फे उद्या धुळ्यात मोर्चा