‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर

टीम महाराष्ट्र देशा- लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित, सौरभ भावे लिखित तसेच रोहन देशपांडे दिग्दर्शित ‘पिप्सी’ हा सिनेमा २७ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. लहानग्यांचा समाजातील वास्तव्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मांडणाऱ्या या सिनेमाला सिनेप्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. चिमुकल्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या सिनेमाने शालेय विद्यार्थ्यांच्या मनातदेखील घर केले आहे. कारण, लॅन्डमार्क फिल्म्सने आयोजित केलेल्या ‘फिल्मशाला’ या आंतरशालेय राज्यस्तरीय चित्रपट समीक्षण स्पर्धेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे हे सिद्ध झाले आहे. विविध चाळणी प्रक्रियेतून पार पडलेल्या या स्पर्धेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.

लहान मुलांच्याच नजरेतून ‘पिप्सी’ सिनेमाचे समीक्षण लोकांसमोर मांडणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या स्पर्धेला महाराष्ट्रातील तमाम शाळेतून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. राज्यभरातून तब्बल १२ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ज्यात काही वंचित आणि गरजू प्रवर्गातील विद्यार्थ्यांचादेखील सहभाग होता.

Loading...

राज्यभरात यशस्वी पार पडलेल्या या स्पर्धेविषयी बोलताना पिप्सी सिनेमाच्या प्रस्तुतकर्त्या आणि निर्मात्या विधि कासलीवाल सांगतात कि, ‘आपल्या सभोवताली अनेक हुशार मुलं आपल्याला दिसून येतात, त्यांच्यातल्या या गुणवत्तेला बाहेर काढण्यासाठी ‘पिप्सी’ सारख्या वैचारिक आणि मनोरंजक सिनेमाचा उपयोग करून घ्यावा असे मला वाटले. ‘फिल्मशाला’ मार्फत आम्हाला मिळत असलेला जबरदस्त प्रतिसाद पाहून मला भरपूर आनंद झाला. प्रत्येक स्क्रीनिंगनंतर आम्ही सिनेमाविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तेव्हा, त्यांच्यातील परिपक्वता आणि विचारगहनतेबाबत मला खरच आश्चर्य वाटले, या चित्रपटामधून त्यांनी घेतलेला बोध कौतुकास्पद आहे. ‘फिल्मशाला’ सारख्या उपक्रमामुळे आपल्या भविष्यातील प्रेक्षकांची विचारसरणी वृद्धिंगत होण्यास मदत होईल, जेणेकरून भावी काळात प्रदर्शित होणा-या चित्रपटांचा आशय आणि दर्जा सुधारण्यासाठी आपण प्रेरित होऊ. तूर्तास हेच लक्ष्य अंगी बाणले असून, दरवर्षी हा उपक्रम राबवण्याचा विचार आहे’.

मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी या राज्यपुरस्कार विजेत्या बालकलाकारांच्या समृद्ध अभिनयाने नटलेला पिप्सी हा सिनेमा ‘फिल्मशाला’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३०० हून अधिक शाळेतील विध्यार्थ्यांना दाखवण्यात आला. ज्यात ‘पिप्सी’ सिनेमाबद्दलचे विद्यार्थ्यांचे मत आणि समीक्षण विचारात घेतले गेले. त्यासाठी, शाळेतील प्राथमिक विभागासाठी ‘टायनी ट्वीट’ या उपक्रमाद्वारे अनुक्रमे २०० अक्षरांमध्ये व माध्यमिक विभागासाठी ‘राईट व्ह्यू’ या उपक्रमाद्वारे अनुक्रमे ५०० शब्दांमध्ये ‘पिप्सी’ सिनेमा कसा वाटला या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी अभिनेते सचिन पिळगावकर, दिव्या दत्ता आणि सी.एफ.एस.आय. समितीचे माजी सदस्य आणि लेखक कमलाकर नाडकर्णी या दिग्गजांनी परीक्षकांची भूमिका बजावली.

ज्यांद्वारे, जाहीर झालेल्या अंतिम निकाल यादीत, माध्यमिक शाळेतील ‘राईट व्ह्यू’ स्पर्धेमध्ये मराठी विभागातून तृष्णा नाईक (चोगले हायस्कूल), इंग्रजी विभागातून इशिका तुलसियन (आदित्य बिर्ला वर्ल्ड अकादमी) आणि हिंदी विभागातून कांचन यादव (दिक्षित रोड म्युनिसिपल स्कूल) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर प्राथमिक शाळेतील ‘टायनी ट्वीट’ स्पर्धेमध्ये उदयाचल प्रायमरी स्कूलच्या स्वयम हांडेने प्रथम पारितोषिक पटकावले.

भारतात बरीच वर्ष शाळकरी युनिफॉर्म फॅब्रिक ब्रॅण्डमध्ये आघाडीवर असलेल्या ‘एस.कुमार्स’ यांनी आणि भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन मनोरंजन तिकीट प्लॅटफॉर्म असलेल्या बुक माय शो यांच्या बुक अ स्माईलने या उपक्रमासाठी पुढाकार घेत, विशेष भागीदारी केली होती, तसेच अनेक स्वयंसेवी संस्थाचादेखील यात सहभाग होता.

या स्पर्धेतील अंतिम विजेत्यांना डिजिटल व्हिडियो कॅमेरेद्वारे आकर्षक बक्षिसे बहाल केले जाणार आहेत. स्पर्धेचा निकाल खालीप्रमाणे,

राईट व्ह्यू (मराठी)

प्रथम पुरस्कारः तृष्णा नाईक – चोगले हायस्कूल

द्वितीय पुरस्कार: सानिका मानकर – उदयाचल हायस्कूल

तृतीय पुरस्कारः सई बचुटे – उदयाचल हायस्कूल

चौथा पुरस्कारः जान्हवी बापट – चोगले हायस्कूल

पाचवा पुरस्कारः अरमान कांबळे – समता विद्यामंदिर

राईट व्ह्यू (इंग्रजी)

प्रथम पुरस्कारः इशिका तुलसीयन – आदित्य बिर्ला वर्ल्ड अकादमी

द्वितीय पुरस्कारः अमेय दोशी – पोदार ओ.आर.टी. इंटरनॅशनल स्कूल

तृतीय पुरस्कारः अद्विका श्रीनिवासन – उदयाचल हायस्कूल

चौथा पुरस्कार: आर्य मेनन – एवलॉन हाइट्स इंटरनॅशनल स्कूल

पाचवा पुरस्कारः भव्य कृष्णन – एवलॉन हाइट्स इंटरनॅशनल स्कूल

राईट व्ह्यू (हिंदी)

प्रथम पुरस्कारः कांचन यादव – दीक्षित रोड म्युनिसिपल स्कूल

द्वितीय पुरस्कार: प्रीती गुप्ता – दीक्षित रोड म्युनिसिपल स्कूल

राईट व्ह्यू (विशेष जूरी पुरस्कार)

प्रथम पुरस्कारः झोइ ओबेरॉय – आदित्य बिर्ला इंटीग्रेटेड स्कूल

द्वितीय पुरस्कारः श्रुती वालावे – नित्यानंद बीएमसी स्कूल

टायनी ट्वीट

प्रथम पुरस्कारः स्वयम हांडे – उदयाचल प्राथमिक शाळा

द्वितीय पुरस्कार: आरोही बांदोडकर – उदयाचल प्राथमिक शाळा

तृतीय पुरस्कारः अदिती पराडकर – उदयाचल प्राथमिक शाळा

फिल्मशाला २०१८ विजेता

उदयाचल स्कूल

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
जाणून घ्या, नाथाभाऊंच्या एकुलत्या एक मुलाने आयुष्य संपविले त्या दिवशी नेमकं काय घडलं ?