आमदारांचे राजीनामासत्र सुरूच, भारत भालके आणि सीमा हिरे यांनीही दिला राजीनामा

bharat bhalake

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात वणवा पेटला असताना आता मराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. पंढरपुर-मंगळवेढा मतदार संघातील आमदार भारत भालके यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

rajinama bharat bhalake

दरम्यान, मराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक मधील देवळा- चांदवड मतदार संघातील आमदार डॉ राहुल आहेर आणि पश्चिम नाशिक मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे यांनी आज आमदारकीचा राजीनामा मराठा क्रांती समाजच्या समन्वयकांकडे सुपूर्द केला.

काल मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला आहे. राज्यात माणसे मरू लागली आहेत. अख्खा महाराष्ट्र पेटला तरी आपले सरकार काहीही करत नाही. सरकार तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण लागू करू शकते. मात्र सरकारची तशी इच्छा दिसत नाही, असे सांगत कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

कालच मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर या आमदाराने राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे हे राष्ट्रवादीचे पहिले आमदार ठरले आहेत.

मराठा आरक्षण : नदीत उडी घेऊन एकाने दिला जीव

मराठा समाजाचा असंतोषाला मुख्यमंत्रीच जबाबदार, शरद पवार यांनी फडणवीसांना फटकारले

मराठा समाजाचा तात्काळ ओबीसी प्रवर्गात समावेश करुन आरक्षण द्या : आ.भुमरे