सवर्णांना मिळालेले आरक्षण हे आरपीआयच्या संघर्षाचे यश ; आरपीआयचा दावा

ramdas aatahavle

टीम महाराष्ट्र देशा : सवर्णांना आरक्षण मिळाले पाहिजे,ही मागणी प्रथम सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली असून आरपीआयने यासाठी अनेकदा केंद्रसरकारकडे पाठपुरावा केला आहे.आरपीआयच्या या मागणीला यश आले आहे. असे मत आरपीआयचे राष्ट्रीय निमंत्रक  अॅड मंदार जोशी यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना व्यक्त केले.

आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सोमवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० टक्के आरक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आरक्षणाचा कोटा ४९. ५ टक्क्यावरून वाढून तो ५९.५ टक्क्यांवर पोहोचणार आहे.पुढे बोलताना जोशी म्हणाले,’सवर्णांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागसलेपान असणार्यांची संख्या अधिक आहे. त्यांना आता आरक्षण दिल्यामुळे समाजा-समाजातील तील दुरी कमी होईल.’