मातंग समाजाच्या स्वतंत्र आठ टक्के आरक्षणाच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा

मुंबई – लोकशाहिर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटींचा निधी देण्यात यावा; मातंग समाजाच्या विकासासाठी लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात; लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईत उभारावे या मागाण्यांसह मातंग समाजाला स्वतंत्र 8 टक्के आरक्षण देण्यात यावे. या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा जाहीर करून समाजाच्या विकासासाठी मातंग समाजाच्या तरूणांनी उद्योग तथा सहकार क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 98 व्या जयंती निमित्त सुमननगर चेंबूर येथे आयोजित सभेत ना रामदास आठवले बोलत होते. सभेपुर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या येथील पुतळ्यास जयंतीनिमित्त पुष्पहार वाहून ना रामदास आठवलेंनी आदरांजली वाहिली. यावेळी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे,जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे,दिपकभाऊ निकाळजे, संजय डोळसे,,अनिस पठाण, महादेव साळवे, विशाल तुपसुंदर, नंदकुमार साठे,रमेश घोक्षे,गणेश रावखंडे, डॉ हरीश अहिरे, हसन शेख, रवी गायकवाड, हेमंत रणपिसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देऊन गौरवण्यात यावे या मागणीचे पत्र आपण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पाठविले असल्याची माहिती यावेळी ना. रामदास आठवले यांनी दिली. अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजात जन्माला आले. अवघे दीड दिवस ते शाळेत गेले मात्र त्यांच्या साहित्याने त्यांच्या बुद्धिमत्तेच्या तेजाने जग दिपले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णाभाऊ साठेंचा योगदान मोठे आहे. अण्णांनी त्यांची फकिरा ही कादंबरी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली आहे. जग बदल घालुनी घाव सांगून गेले आम्हा भीमराव ही काव्यपंक्ती लिहून अण्णाभाऊ साठेंनी सर्व अनुसूचित जातीजमातींनी बहुजनांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा मार्ग स्वीकारला पाहिजे असे आवाहन केले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानुसार मातंग समाजाने पिवळा झेंडा घेऊन बौद्धांच्या निळ्या झेंड्या सोबत एकत्र आले पाहिजे. पिवळा आणि निळा एकत्र आला पाहिजे. मातंग आणि बौद्धांची एकजूट मजबूत करण्याचे आवाहन ना रामदास आठवलेंनी यावेळी केले.
मातंग समाजात दिवंगत बाबासाहेब गोपले यांनी राजकीय जागृती आणली. मातंग समाजाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला 5 एकर जमीन शासनाने द्यावी यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले.

कोण आंबेडकर ? विचारणाऱ्या हार्दिक पांड्याला दणका

व्यासपीठ : ‘जगात देखनी अण्णाभाऊ साठेंची लेखनी’…