रिपब्लिकन पक्षाच्या शहराध्यक्ष पदाची निवडणूक 8 जुलै ला होणार

पुणे : गेल्या काही दिवसांपासून रिक्त असणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शहर अध्यक्ष पदाची निवडणूक येत्या 8 जुलै 2018 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत डॉ .बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अहिल्याश्रम नाना पेठ येथे होणार आहे. या वेळी शहरातील सुमारे 3 हजार सक्रिय सभासद मतदान करणार आहेत. अशा प्रकारे रिपब्लिकन पक्ष्यची होणारी निवडणूक ही महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

पुणे शहरातून तब्बल 11 इच्छुक उमेदवार निडणुकीसाठी उभे आहेत. यासाठी स्वतंत्र आचारसंहिता सुध्दा तयार करण्यात आली आहे. इच्छुकांची संख्या जास्त आहे. यामध्ये अशोक शिरोळे,शैलेश चव्हाण,अशोक कांबळे ,महेंद्र कांबळे ,संजय सोनवणे,बसवराज गायकवाड, संगीता आठवले, माहिपाल वाघमारे यासह 11 उमेदवार रिंगणात आहेत. तरीही अशोक शिरोळे,शैलेश चव्हाण,अशोक कांबळे,संजय सोनवणे ,महेंद्र कांबळे यांच्यामध्ये प्रमुख लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

निडणुकीचा निकाल त्याच दिवशी सांयकाळी 6 ते 9 यावेळी मतमोजणी होऊन जाहीर करण्यात येईल.
या निवडणुकीत निडणूक निर्णय अधिकारी म्हणून पक्ष्याचे निरीक्षक एम.डी. शेवाळे हे काम पाहणार आहेत.

मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

न्यायालयाचे सरकारला लोकपालांच्या नियुक्तीसबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन संजय निरुपम यांना हटवणार ?