fbpx

प्रजासत्ताक दिनी दहशतवाद्यांना कंठस्नान

टीम महारष्ट्र देशा : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने आज प्रजासत्ताक दिनी आपल्या शौर्याने दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. श्रीनगरमधील खोनमोह येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. तसेच शुक्रवारी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमध्ये  अनंतनाग आणि पुलवामा जिल्ह्यात जवानांवर ग्रेनेड हल्ला केला होता.

सुरक्षा दलाला खोनमोह येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच जवानांनी शोधमोहीम सुरु केली. शोधमोहीम सुरु असतानाच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. यानंतर उडालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

1 Comment

Click here to post a comment