नऊ नगरसेवकांच्या हकालपट्टीमुळे एमआयएमचे विरोधीपक्षनेतेपद धोक्यात

औरंगाबाद : महापालिकेत एमआयएम पक्षाची वाताहत झाली असून, नऊ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे 24 नगरसेवकांची संख्या घटून 15 झाली आहे. सदस्य कमी झाल्याने एमआयएमचे महापालिकेतील विरोधीपक्षनेतेपदही धोक्यात आले आहे.

उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पक्षाचा आदेश न पाळल्यामुळे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी सहा नगरसेवकांची मंगळवारी (ता. 31) हकालपट्टी केली. कारवाई केलेल्या नगरसेवकांमध्ये सायरा बानो अजमल खान, संगीता वाघुले, नसीम बी सांडू खान, विकास एडके, शेख समिना आणि सलीमा बाबूभाई कुरेशी यांचा समावेश आहे.

Loading...

उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सलीमा बाबू कुरेशी यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले तर आठ नगरसेवक गैरहजर राहिले. त्यातील जमीर कादरी आणि अजीम अहमद रफिक हे पूर्व परवानगी घेऊन इराकला गेलेले आहेत तर साजेदा सईद फारुखी या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यामुळे या तिघांना वगळून उर्वरित पाच गैरहजर नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली.

महापालिकेत एमआयएमचे एकूण 24 नगरसेवक होते. त्यातील तसनीम बेगम, जहॉंगीर खान मुलाणी आणि सय्यद मतीन यांची आधीच हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यातील सय्यद मतीन हे सध्या कारागृहात आहेत. तर तसनीम बेगम यांनी शिवसेनेला आणि जहॉंगीर खान मुलाणी यांनी भाजप पुरस्कृत उमेदवाराला मतदान केले.

आतापर्यंत तब्बल नऊ नगरसेवकांवर कारवाई करण्यात आल्यामुळे नगरसेवकांची संख्या तब्बल 15 वर आली आहे. त्यामुळे पक्षाचे महापालिकेतील विरोधी पक्षनेतपदही धोक्यात आले आहे. महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक 29 नगरसेवक आहेत. त्यापोठापाठ एमआयएमची 24 एवढी संख्या होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी