बेपत्ता विमान एएन-३२ चे अवशेष सापडले

नवी दिल्ली : भारताच्या बेपत्ता एएन-३२ विमानाचे अवशेष अरुणाचलमधील लिपोमध्ये सापडले आहे. ३ जूनपासून भारतीय हवाई दलाचे एएन-३२ विमान बेपत्ता होते. एएन हे मालवाहू विमानाचा ३ जून आसाममधील जोरहाट विमान तळावरून दुपारी १२.२५ वाजल्यापासून संपर्क तुटल होता. या विमानात ५ प्रवासी ८ क्रू मेंबर्स असे एकूण १३ प्रवासी घेऊन विमान अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथे जाणार होते.