नीरव मोदीच्या कंपनीशी काँग्रेस नेत्यांचा संबंध- भाजपाचा आरोप

Nirmala-Sitharaman-

नवी दिल्ली: केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवरील सर्व आरोपांचे खंडन केले. पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या ११,३०० कोटींच्या घोटाळया प्रकरणी विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली होती.

निर्मला सीतारामन यांनी कॉंग्रेस वर आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांचेच एकमेकांशी साटेलोटे आहेत. ‘नीरव मोदी याच्या गीतांजली जेम्सला २०१३ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजारात व्यवहार करण्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. मात्र, तरीही त्यावेळी राहुल गांधी यांनी गीतांजली जेम्सच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

नीरव मोदीच्या फायर स्टार डायमंड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशीही काँग्रेस नेत्यांचा संबंध आहे. नीरव मोदीने अद्वैत होल्डिंग्सकडून मुंबईतील मालमत्ता लीझ करारावर घेतली होती. त्यावेळी काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांची पत्नी अनिता सिंघवी या कंपनीच्या समभागधारक होत्या. त्यामुळे काँग्रेसने त्यावेळी हा घोटाळा लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर टीकेची झोळ उठवली आहे.