fbpx

संस्कृत विभागाची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू होणार

uni pune1

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागात पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यास क्रमासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर विद्यापीठाकडून प्रवेश नियमात बदल करण्यात आले होते. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला होता. महाराष्ट्र देशाने सदर प्रकरणाचा पाठपुरवठा केला. तसेच निषेध म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने विद्यापीठात केलेल्या आंदोलनला यश आले असून सोमवार पासून विद्यार्थांना प्रवेश मिळणार आहेत.

संस्कृत विभागात एकूण १३ विविध अभ्यासक्रम चालविले जातात. सर्व विभागातिल ३९० जागेसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली होती. त्यासाठी एकूण ११८ अर्ज विद्यापीठास प्राप्त झाले होते. विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यावर विद्यापीठाने अकरावीत व बारावीत संस्कृत विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार अशी अट टाकली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय झाला होता. नवीन अटींमुळे फक्त ४५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. तसेच एकूण ९०% जागा रिक्त होत्या. विद्यापीठाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राचे संचालक सुट्टीवर असल्यामुळे  सोमवारपासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. असे कुलसचिव डॉ. ए. डी. शाळीग्राम यांनी सांगितले. तसेच अभवीप विद्यापीठ प्रमुख श्रीराम कंधारे यांचा सोबत सवांद साधला असता. ते म्हणाले, संस्कृत विभागाची चूक  विद्यापीठाने मान्य केली आहे. या प्रकरणात आम्ही वेळोवेळी निवेदन दिले तसेच कुलगुरूंच्या दालनात निषेध आंदोलन केले. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थांना प्रवेश मिळणार आहेत. विद्यापीठाने विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतल्यामुळे आम्ही समाधानी आहोत.