शारीरिक संबधास नकार दिल्याने पत्नीस हातपाय बांधून जाळले

crime

बीड / प्रतिनिधी : शारीरिक संबंधास नकार दिल्याने पत्नीचे हातपाय बांधून जाळल्याची अघोरा प्रकार बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा येथे घडला आहे. यामध्ये पत्नी गंभीररीत्या जखमी झाली असून अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात उपचार सुरूर आहेत. समीर भिमराव जाधव रा. विडा वय वर्षे ३३ या नराधामचे नाव असून ही घटना बुधवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली आहे.

शरीर संबंधास नकार देताच हे कृत्य समिर याने रात्री १२ वाजन्याच्या दरम्यान केले. सदरील पिडीत महिलेच्या लहान मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्या लोकांनी आग विजवून महिलेचे हातपाय सोडले व समिर जाधव यास चांगला चोप दिला. पिडीत महिलेला गावकऱ्यांनी केज येथील उपजिल्हारूग्णालयात दाखल केल्यावर येथील डॉक्टरांनी तीला गंभीर असल्याने अंबेजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात पाठवण्यात आले असून तीची परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे अध्याप जवाब नोंदवण्यात आला नाही आशी महिती पोलीस जमादार एम एस ढाकणे यांनी दिली आहे.