fbpx

सामन्यांच्या लालपरीचा प्रवास आता महागणार

ST-Bus-

टीम महाराष्ट्र देशा: सामन्यांची लालपरी म्हणून ओळख असणाऱ्या एस टी बसचा प्रवास आज मध्यरात्रीपासून महाग होणार आहे., कर्मचारी वेतनवाढ वाढलेले इंधनाचे दर आदी कारणांमुळे एसटी महामंडळावर जादा भार पडत आहे. त्यामुळे हा ताण कमी करण्यासाठी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून तिकिटांच्या दरात १८ टक्केवाढ होणार आहे.

वेतन कमी मिळत असल्याने मागील दिवाळीत कर्मचारी बेमुदत संपावर गले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करण्यात आल्याने दरवर्षी १,२०० कोटी रुपयांचा भार महामंडळावर पडणार आहे. तर वाढलेल्या इंधन दरामुळे अतिरिक्त ४६० कोटी रुपयांचा भार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवाढीतून वर्षाला सुमारे एक ते दीड हजार कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळणार असल्याच सांगितल जात आहे.

1 Comment

Click here to post a comment