शहर पोलीस वाहतुक नियंञक शाखेची धडक कारवाई ९६ हजार रुपयांची दंड वसुली.

अकोला / सचिन मुर्तडकर : अकोला शहर पोलीस वाहतुक नियंञक शाखेने २३ऑगष्ट ला केलेल्या धडक कारवाई मध्ये विना परवाना वाहतुक करीत असलेल्या १८८ वाहन चालकांविरुध्द मोटर वाहन कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येवून ९६ हजार रुपयांचा दंड वसुली करण्यात आली.

अकोला शहरातील बेलगाम वाहुतकीला नियंञण घालतांना शहर वाहतुक नियंञक शाखेने शहरामध्ये शहरी व ग्रामिण भागातील विना परवाना वाहन चालविणाऱ्या वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर धडक कारवाई करण्यात येवून दिवसभरात करण्यात आलेल्या कारवाई मध्ये मोटार वाहन कायद्यांतर्गत १८८ वाहन चालकांविरुध्द केलेल्या कारवाई मध्ये ९६ हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली.

शहरामध्ये विना परवाना व परमिटचे उल्लंघन करणाऱ्या ७० ऑटो चालकांविरुध्द सुध्दा परमिट चे उल्लंघन केल्याने कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असून या दिवस भर राबविण्यात आलेल्या धडक कारवाई मुळे शहर व ग्रामिण भागातील विना परवाना व विना परमिट वाहन चालविणाऱ्या चालकांमध्ये धडकी बसली आहे.दरम्यान सदर कार्यवाही वाहतूक शाखे चे प्रमुख विलास पाटिल यांनी केली आहे

You might also like
Comments
Loading...