मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांशी शिवसेना नेत्यांचा संपर्क झाला आहे, असा दावा काही शिवसेना नेत्यांनी केलाय. असे एकूण 20 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यांच्यावर भाजपमध्ये विलीन होण्यासाठी दबाव टाकला जातोय. मात्र बंडखोर आमदारांनी नकार दिल्याचं कळतंय. यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी सांताक्रुझमध्ये युवासेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले कि, बंडखोरांनी २० जून रोजी बंड पुकारला. मात्र धनुष्यबाण हा आपलाच राहणार, शिवसेना पक्ष आणि प्रेम आपलच राहणार. बंडखोरांपुढे दोनच पर्याय आहेत. एकतर प्रहार पक्षात विलीन व्हा, नाही तर भाजपमध्ये विलीन होणं हेच पर्याय असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. परत यांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही. त्यांना निवडणुकीत पाडणार असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, बंड पुकारल्याने बंडखोरांनी सर्व मान सन्मान गमावला. काल एक व्हिडिओ व्हायरल झाला, तो तुम्ही बघितलाच असेल. आज हा मेळावा गुवाहाटीतून बंड पुकारलेले आमदार बघतच असले. ते म्हणत असेल किती गर्दी झाली आहे मेळाव्याला. तसेच निवडणूक लढवा, तुम्ही पडल्याशिवाय राहणार नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना म्हणाले, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? घ्या मी तुम्हाला मुख्यमंत्री बनवतो. मात्र या प्रश्नानंतर एकनाथ शिंदे यांनी टाळाटाळ सुरू केली आणि त्यानंतर 20 जून रोजी बंड केला.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<