औरंगाबादमधील मॉब लिंचिंगचे भिंग फुटले, भांडणाचे कारण ‘जय श्री राम’ नसून वेगळेचं

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशात सध्या ‘जय श्री राम’ या घोषणेवरून वातावरण तापलेले दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी ‘जय श्री राम’ ही घोषणा द्या अशी सक्ती करण्यात येत आहे. अशातच औरंगाबादमधेही असाच प्रकार घडल्याच समोर आलं होत. मात्र आता या घटनेचे पितळ उघडे पडले आहे. सदर घटना ही मॉब लिंचिंगची असल्याच सांगण्यात येत होते, मात्र आता स्वतः पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी हा प्रकार मॉब लिंचिंगचा नसून रस्त्यावरील भांडणाचा असल्याचं म्हटलं आहे.

याबाबत पोलीस आयुक्त म्हणाले की, औरंगाबादमधील सोमवारी झालेला मारहाणीचा प्रकार मॉब लिंचिंगचा नसून रस्त्यावरील भांडणाचा आहे. औरंगाबाद पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. जर कुणी चुकीची तक्रार केली असेल, तर त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल.

दरम्यान औरंगाबाद शहरातील आझाद चौक येथे मध्यरात्रीच्या सुमारास झोमॅटोचे दोन डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून ऑर्डर पोहोचवण्यासाठी जात असताना परिसरातील काही जणांनी त्यांना अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच या डिलिव्हरी बॉयना ‘जय श्रीराम’चे नारे लावण्यासही जबरदस्ती केली, अशी घटना समोर आली होती. मात्र सखोल चौकशीनंतर मॉब लिंचिंगचा प्रकार घडलाच नसल्याचं समोर आल आहे.