औरंगाबाद दंगलीचे भयाण वास्तव

औरंगाबाद / अभय निकाळजे : औरंगाबाद शहरात गेल्या शनिवारी झालेली जाळपोळ ही मुळात ‘दंगल’ या व्याख्येत न बसणारी आहे. दोन भिन्न जातींचे जमाव ते अगदी तीस ते चाळीस नाही तर 10 ते 12 जणांचे जमाव जून्या भाडेकरूंनी जागा रिकाम्या करून द्याव्या म्हणून भिडले. त्यातुन जे भाडेकरू वर्षानुवर्ष ज्या वास्तुत घुसलेले होते. त्या रिकाम्या करण्यासाठीची ही ‘दंगल’. त्यात मग कुणी राजकीय पोळी भाजून घेतली तर कुणी पोलिसांशी असणारी जुनी दुष्मनी ‘सेटल’ केली.
पण या प्रकारात बदनामी औरंगाबादचीच झाली. त्याचे कुणाला म्हणजे अगदी स्थानिक माध्यमांनाही काही देणे- घेणे नाही. हे गेल्या पाच दिवसात दिसते आहे. कारण ज्यांनी औरंगाबादेतील ‘दंगल’ दाहकता अनुभवली आहे, त्यांच्यापैकी दुदैवाने आज कुणी हयात नाही तर कुणी रिपोर्टिगला स्पाॅटवर नाही. त्यामुळे दंगलचे रिपोर्टिंग करण्याच्या अनुनभवामुळे गेल्या पाच दिवसात वातावरण तापविण्याचाच जास्त प्रयत्न माध्यमांकडून विशेषतः वर्तमानपत्रांकडून झाला. त्यातील एक-एक मुद्दा आणि त्यातील वस्तुस्थिती जी त्याच माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे आपण चर्चा करू.

Loading...

दंगल पूर्वनियोजित होती?
औरंगाबादमधून प्रसिद्ध होणाऱ्या सगळ्या दैनिकांनी अगदी पहिल्या दिवसापासून ही दंगल पुर्वनियोजित होती, अशा बातम्या छापल्या. जर ही दंगल पुर्वनियोजित होती, तर शनिवार मध्यरात्री नंतर ही एकाएकी कशी आटोक्यात आली? असा माझा प्रश्न आहे. दूसरा प्रश्न ही दंगल संपुर्ण शहरभर का नाही पसरली? शहराच्या इतर भागातील व्यवहार दंगल सुरू असतांनाही तसेच सुरू होते. जसे शनिवारी सकाळीही सुरूच कसे काय राहीले? जर ही जातीय दंगल होती. तर ज्या भागात ही दंगल झाली, तेथून हाकेच्या अंतरावर ‘भवानीनगर’ , ‘बायजीपुरा’, ‘चेलीपुरा’ असे मिश्र वसाहतींचे भाग येतात. त्या ठिकाणी हा भडका का नाही झाला? मग अशा वस्तुस्थिती वर आपण ही दंगल पुर्वनियोजित होती, असे म्हणणार का?

औरंगाबाद दंगलींची पार्श्वभूमी काय?
शिवसेनेच्या प्रसुतपुर्व काळात औरंगाबादेत जातीय तणावाचे प्रसंग घडले, पण त्याला दोन गटांच्या भांडणाचे स्वरूप देऊन तिथेच थांबविले जात होते. तरीही या मुस्लिम बहुल शहराला धार्मिक तेढ होण्याची 1960 च्या दंगलींची पार्श्वभूमी होती. त्यानंतर शिवसेनेने पक्षाचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी 1986, 1987 अशा सलग दोन दंगली घडवून आणल्या. त्याला तत्कालीन मुस्लिम गुंडगिरीची पार्श्वभूमी होती. त्याचा फायदा घेत औरंगाबादेत शिवसेनेची एण्ट्री झाली. पोलिसांशिवाय या गुंडगिरीला त्या काळात काही प्रमाणात ‘चेक’ बसलाही. पण हा चेक बसतांना शिवसेनेनेही या शहरात आपले बस्तान बसविले. त्याला साथ तत्कालीन स्थानिक दैनिकांनीही दिली. कारण शहरात त्यावेळी कामधंदा नसलेल्या तरूणांना तत्कालीन राजकीय क्षेत्रात संधी नव्हती. या सगळ्या कामधंदा नसलेल्या आणि प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने नाकारलेल्यांनी या शहरात शिवसेनेला वसवले. धार्मिक तेढ एवढा एकच मुद्दा घेऊन शिवसेनेने राजकिय स्वार्थ साधला. त्यालाही बळ देणारे तत्कालीन पत्रकार होते. मग महापौराची निवडणूक असो की कोणतीही संधी असो. तिचा राजकीय फायदा घेण्यासाठी शिवसेनेने औरंगाबादचा वापर करून घेतला. हा काळ औरंगाबादचे पर्यटन नगरीतुन औद्योगिक नगरीत पर्यावसन होत होते. त्या काळात नौकरीच्यानिमित्ताने औरंगाबादेत दाखल झालेल्या प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील कामगारांनी औरंगाबादेत शिवसेनेला वाढवले. त्यांच्या गावी मात्र ते काँग्रेसीच राहीले. या औद्योगिकीकरणाचाही फायदा शिवसेनेने घेतला. मग तो भारतीय कामगार सेनेच्या स्थानापासून ते बजाज कंपनीत 52 दिवसांचा संप करण्यापर्यत, सगळ्या गोष्टीत शिवसेना होती. तसे कम्युनिस्टही मागे नव्हते. अॅरीस्ट्रोक्रॅट कंपनीत मॅनेजर पुरींचा खून झाला. त्यामुळे धार्मिक आणि औद्योगिक अशांत शहर म्हणुन जागतिक पातळीवर औरंगाबाद बदनाम झाले. शहराची आणि पर्यायाने औद्योगिक क्षेत्रातील गतीला खिळ बसली. पण त्याचे फारसे घेणे देणे शिवसेनेला आणि शिवसेनेच्या आर्थिक इशाऱ्यावर नाचणाऱ्या मुस्लिमांना राहिले नाही. कारण निवडणुकांच्या आधी याच पद्धतीने तणाव निर्माण केला की त्यांची राजकीय पोळी भाजून निघते, याचा अंदाज त्यांना आलेला आहे.

आत्ताच्या दंगलींची वस्तुस्थिती
औरंगाबाद जे काही गेल्या शनिवारी झाले. त्याचे लोण शहरभर का नाही पसरले? तर पुर्वी ज्यावेळी औरंगाबाद शहरात दंगल व्हायची त्यावेळी गुलमंडी ते सिटीचौक या रस्त्यावरील व्यापारी संस्था दंगलखोरांच्या ‘टार्गेट’ वर असायच्या. पण 1992 च्या दंगलीनंतर शहराचे दोन भाग झाले. जुना बाजार ते रोषनगेट याला ‘ग्रीन बेल्ट’ अर्थात हिरवापट्टा. जो मुस्लिम बहुल आहे. सिटीचौक ते गुलमंडी आणि मग उर्वरीत शहराचा परिसर म्हणजे ‘भगवा पट्टा’. जो हिंदू बहूल आहे. त्यामुळे दंगली झळ बसेल असे मिश्र वसाहतींचे काही पट्टे शहरात शिल्लक आहेत, त्यापैकीच एक राजाबाजार. तिथेच शुक्रवारी मध्यरात्री ही दंगल झाली. म्हणजे वाटणी झाल्यामुळे दंगलीचे लोण शहरभर पसरले नाही. दूसरा महत्त्वाचा मुद्दा असा की गुलमंडी किंवा औरंगाबाद शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने पारंपारीक व्यवसाय करणाऱ्यांनी बंद केली आहेत. ती दुकाने त्यांनी त्यांच्याच दुकानापुढे हातगाडी लावुन व्यवसाय करणाऱ्या दिवसी भाडे तीन हजाराप्रमाणे देऊ केले. त्यामुळे गेल्या काही वर्षात व्यापाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या शिवसेनेच्या आणि पर्यायाने शिवसेना नेत्यांच्या आर्थिक लाभात तुट येत आहे. त्यात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघ जो शिवसेना आपला बालेकिल्ला मानते, तो गड अनेक वर्षांनी एमआयएम नी हिस्काऊन घेतला. त्याला भाजप सेनेतील वितुष्टही कारण आहे. त्या निवडणुकीच्या मतदानाच्यावेळी शिवसेनेला पराभव दिसत होता. तेव्हाही त्यांनी हिंदू मते मिळविण्यासाठी तणाव निर्माण केला होता. एमआयएमच्या उमेदवाराला मारहाण करून मुस्लिम तरूणांना उचकाविण्याचा प्रयत्न झाला. पण त्यावेळी एमआयएमने संयम दाखवला म्हणून दंगल झाली नाही. दंगल शहरात का झाली नाही? तर जे हातगाडीवर व्यवसाय करीत होते, ते दुकानात गेल्याने त्यांचा हल्ला करण्याचा किंवा नुकसान करण्याचा मुद्दाच संपला. राजाबाजात संस्थान गणपतीच्या मंदिराला लागून असणाऱ्या दुकानांना आग लागते. पण गणपतीला धक्का का नाही लागला? तर संस्थान गणपतीच्या लगत असणारी दुकाने ही पारंपारीक अत्तर आणि सुगंधी द्रव्य विकणाऱ्यांची होती. ती गेल्या 50 पेक्षा अधिक वर्षांपासुन भाड्याने दुकान घेऊन व्यवसाय करतात. ती दुकाने त्यांनी सोडावीत म्हणून संस्थान गणपती मंदिराला धक्का न लावता आग लावली गेली. त्यात कुणाचा फायदा झाला, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल. म्हणून ही जातीय नाही तर दुकानदार आणि दुकानाचे मालक यांच्यातील जागा रिकामी करण्याच्या कारणाची किनार आहे.
एवढ्या छोट्या कारणासाठी झालेली ही झटापट दंगल कशी? म्हणुन या दंगलीचे भांडवल करून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी निघालेल्या शिवसेनेची मात्र पुरती गोची झाली. यापुर्वी मिळवलेल्या यशावर स्वार होण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सपशेल फेल झाला. म्हणुन नगरसेवक राजेंद्र जंजाळ किंवा लच्छू पहेलवान यांना अटक केल्यानंतरही गडबड करू शकले नाहीत.Loading…


Loading…

Loading...