‘नारायण राणेंना खरा धोका त्यांचा दोन गुंडप्रवृत्तीच्या मुलांपासून’

rane

चिपळून:- विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. त्यावरुन आता जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आल्यानंतर माझ्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार नारायण राणे यांनी दिली होती.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच आहे.  बाकी त्यांना कोणताही धोका नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडू नये, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी काल चिपळूण येथे केली आहे.

तसेच नारायण राणेंना दहशतवाद्यांपासून धोका नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सक्षम सरकार आहे. केंद्रात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी राणेंना त्यांच्या दोन मुलांपासून धोका आहे. निलेश आणि नितेश दोघेही गुंड प्रवृत्तीचे आहेत. निलेश राणेला मतदारांनी घरी बसविले. नितेश राणेकडे चांगले गुण असल्यामुळे तो पुढे जाईल असे वाटले होते. परंतु त्यांची गुंडप्रवृत्ती त्यांना भविष्यात घरात बसवल्याशिवाय राहणार नाही. राणेंनाही खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच असल्याचे राऊत यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या