Disha Salian | मुंबई : सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) च्या मृत्यू प्रकरणात (Disha Salian Death case) मोठा खुलासा झाला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची एकेकाळची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. दिशाचा सामूहिक बलात्कार करून खून केल्याचा आरोप नारायण राणेंनी केला होता. मात्र, आता सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर केलाय.
यात त्यांनी दिशाचा मृत्यू दारूच्या नशेत तोल गेल्यानं आणि १४ व्या मजल्यावरून पडून झाल्याचं म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यूच्या पाच दिवस आधी दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरण हे सुशात सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाशी जोडलं जात होतं. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपही झाले.
मात्र, दिशा सालियन (Disha Salian) मृत्यूप्रकरणाचा सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणाशी कोणताही संबंध नाही. दिशाचा मृत्यू अपघातीच असल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे. 8 जूनच्या रात्री दिशाने एक पार्टी आयोजित केली होती. त्यात ती मद्यधुंद अवस्थेत १४ व्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून खाली कोसळली असल्याचे सीबीआयने माहिती अहवालात दिली आहे.
दरम्यान, सीबीआयच्या अहवालानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांनी आदित्य ठाकरे यांची माफी मागायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- NCP vs BJP | राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का!, राष्ट्रवादीच्या 200 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
- Aditya Thackeray | “आधी प्रकल्प पाठवले, आता मंत्रिमंडळ पाठवलं”; आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- UPI Update | PhonePe, GooglePe आणि Paytm वापरणाऱ्यांसाठी लवकरच येणार ‘हा’ बदल
- Sanjay Raut | “सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे, काही बरं वाईट…”; संजय राऊतांचे गंभीर आरोप
- Urfi Javed | अशी कोणती ही फॅशन?, कपडे सोडून उर्फीने समोर ठेवले दोन ग्लास