तुमचं ३७०  राहुद्या, माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल हा खरा प्रश्न – पवार

टीम महाराष्ट्र देशा : राज्यभरात विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचाराची धामधूमी वाढली आहे. या धामधुमीत प्रत्येक राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ”कलम ३७० आणि ३७१ हा राज्यभरातील जनतेचा मुद्दा नसून शेकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव कसा मिळेल, कपाशीला भाव कसा मिळेल हा खरा प्रश्न आहे. ” असे म्हणत सत्ताधारी पक्षांवर तोफ डागली. कन्नड येथील सभेत उपस्थितांशी संवाद साधून त्यांनी संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार संतोष कोल्हे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

गेल्या पाच वर्षात सरकारने जीएसटी, नोटबंदी सारखे निर्णय घेतले. मात्र शेतकऱ्यांच्या शेमालाला हमीभाव मिळण्यासाठी कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्याआधारे पवार यांनी ” नागालॅंड, मेघालय, अरूणाचल, सिक्कीम या ईशान्येकडील राज्यांमध्ये जमीन घ्यायचा अधिकार आपल्याला नाही, त्याचं काय.. खरंतर देशात कलम ३७० किंवा ३७१ यापेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल, कपाशीला भाव कसा मिळेल हा खरा प्रश्न आहे.” आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे.

निवडणुकांच्या प्रचारसभेत शेतकऱ्यांना न कर्जमाफी मिळाली न शेतमालाल हमीभाव. याउलट पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यभरात प्रचारसभेत बोलताना कलम ३७० आणि ३७१ च्या मुद्द्यावर बोलत असतात. मी पंतप्रधानांना नम्रपणे सांगू इच्छितो की, पंतप्रधान हे पद देशाच्या इभ्रतीचं पद आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. आम्ही पंतप्रधान पदाची बेइज्जती कधी होऊ देणार नाही. परंतु पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाने सुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहील अशी पावले टाकली पाहिजेत.” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

” भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काश्मिरची भाषा, संस्कृती वेगळी असल्याने त्यांच्या अधिकाराला संरक्षण देण्यासाठी घटनेत ३७० चे कलम आणण्यात आले. आता कलम ३७० हटवल्याने आपण तिथली जमीन खरेदी करू शकतो, हाच बदल झाला आहे. मात्र याचा गाजावाजा आजचे राज्यकर्ते मोठ्या प्रमाणावर करत आहेत. मात्र या सर्वांचा गाजावाजा न करता राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, पीकविमा, कर्जमाफी, दुष्काळ याविषयावर विचार करून निर्णय घेण्यात यावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महत्त्वाच्या बातम्या :