इंधन दरवाढी वरून आरबीआय गव्हर्नर यांच सरकारला अप्रत्यक्ष आवाहन

आरबीआय

मुंबई: महागाई मुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ आज देखील कायम आहे. शंभरीच्या जवळ गेलेल्या पेट्रोल आणि डीझेल मध्ये सातत्याने वाढ कायम आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने या आधीच शंभरी पार केली आहे. या विरोधात सामान्यांसह विरोधी पक्ष देखील आक्रमक होत आहेत.

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यानीं टॅक्समध्ये घट करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी सल्ला दिला आहे. आर बी आय च्या मॉनिटरी पॉलिसीच्या मिनट्समध्ये शक्तीकांता दास यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला इनडायरेक्ट टॅक्समध्ये कपात करण्यासाठी आवाहन केलं आहे. टॅक्समध्ये कपात केल्यानंतर इंधनांच्या दरात देखील घसरण होईल असं देखील ते म्हणाले.

कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या इनडायरेक्ट टॅक्समुळे आवश्यक वस्तूंवरील दर वाढले आहेत. ज्यामध्ये ट्रान्सपोर्ट आणि आरोग्य सेवेचा देखील समावेश आहे. दरम्यान पेट्रोलचे दर वाढल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास देखील महागला आहे. फेब्रवारी महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात 15 वेळा वाढ नोंदवण्यात आली आहे. याआधी जानेवारी महिन्यात 10 वेळा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. यादरम्यान पेट्रोल 2.59 रूपयांनी तर डिझेल 2.61 रूपयांनी वाढले आहेत. 2021 पासून पेट्रोलचे दर सतत वाढतच आहेत. १ जानेवारी रोजी पेट्रोलचे दर 83.71 रूपये होते, तर आत त्याच पेट्रोलसाठी 90.93 रूपये मोजावे लागत आहेत.

महत्वाच्या बातम्या