भारतात प्रदर्शित झालेली पहिली फिल्म पाहण्याचा दुर्मिळ योग

121 वर्षांपूर्वी झाली होती पहिली फिल्म प्रदर्शित 

पुणे : भारतात फिल्मचे प्रदर्शन होण्याच्या घटनेला 121 वर्षपूर्ण होत आहेत.  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडून रविवार दिनांक 9 जुलै 2017 रोजी संग्रहालयाच्या थिएटरमध्ये सायंकाळी 5 वाजाता एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ल्युमिअर्स ब्रदर्स’ या परदेशी नागरिकांनी  भारतात पहिली फिल्म दाखविली. तिच फिल्म आज  (रविवार, 9 जुलै) पुन्हा पाहण्याची पुणेकरांना संधी मिळणार आहे.

भारतात फिल्म दाखविण्यापूर्वी ल्युमिअर्स ब्रदर्स यांनी सर्वप्रथम 28 डिसेंबर 1895 रोजी पॅरीस येथे ही फिल्म दाखविली होती. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच 7 जुलै 1896 रोजी मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये ही फिल्म दाखविण्यात आली. 121 वर्षांपूर्वी जेव्हा ही फिल्म ल्युमिअर्स ब्रदर्स यांनी दाखविली त्यावेळी पाहणार्‍यांना मोठा आश्‍चर्याचा धक्का बसला. काहीजण तर अक्षरश: घाबरले आणि ओरडत सुटले. कारण, फिल्ममध्ये दाखवलेली रेल्वे आपल्या अंगावर येत आहे. आणि त्यापासून वाचण्यासाठी प्रेक्षकांची अगदी धांदलच उडाल्याचे पहायला मिळाली. असे सांगितले जाते.

ब्रिटिशांनी स्वार्थासाठी का होईना पण  अत्याधुनिक सुविधांनी भारताला संपन्न करण्याकरिता हातभार लावल्याचे इतिहासात अनेक दाखले मिळतात . रेल्वे, दुरदर्शन, दुरध्वनी, रेडीओ यांसारख्या अनेक अत्याधुनिक वस्तु देखील त्यांनी भारतात आणल्या. त्यांच्याप्रमाणेच ‘ल्युमिअर्स ब्रदर्स’ या परदेशी नागरिकांनी देखील भारतात पहिली फिल्म दाखविली.

 

Comments
Loading...