राज्याच्या अनेक भागात पावसानं पुन्हा जोर धरला; धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ

rain

सांगली : राज्यात आज उत्तर आणि दक्षिण कोकणात सर्वत्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्यापैकी सर्वत्र पाऊस पडेल. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार वृष्टिचा दर दक्षिण कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्राच्या घाट भागांमध्ये आणि मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासोबत वीजा आणि जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्याच्या अनेक भागात पावसानं पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली तर बऱ्याच ठिकाणी धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊन, काही धरणांमधून काल पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, कोयना धरणातील विसर्गामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

सध्या कृष्णेची पातळी 17 फुटावर असून सायंकाळपर्यत पातळी 30 फुटापर्यंत जाण्याचा पाटबंधारे विभागाचा इशारा दिलाय. कृष्णेची  इशारा पातळी 35 फूट आहे.कोयना धरणातून 50 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात असल्यामुळे सांगली कृष्णा नदीची पाणी पातळी आज सायंकाळी सुमारे 30 फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासन कडून देण्यात आले आहे. सांगलीच्या वारणा धरणातून 8 हजार कुसेक्सचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर कृष्णेची पातळी हळूहळू वाढू लागली आहे. कृष्णा पातळी 17 फुटावर गेली आहे.

महत्वाच्या बातम्या