नगर जिल्ह्याला चांगले झोडपल्यानंतर पावसाने घेतली थोडी विश्रांती

rain fall nagar

अहमदनगर : नगर जिल्ह्याला सलग 5 दिवस झोडपल्यानंतर बुधवारी सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. तुफानी पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी 100 टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. नगर जिल्ह्यात सुमारे एक आठवड्यापासून चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे आता पर्यंतच्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात सरासरीच्या 100 टक्के इतका पाऊस झाला आहे.

Loading...

अकोले तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 760 मिलिमीटर म्हणजेच 153 टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सर्वात कमी पाऊस कोपरगाव तालुक्यात झाला आहे.

कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत केवळ 301 मिलिमीटर म्हणजे केवळ 68.38 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. यंत्रणेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार नगर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 496 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

श्रीरामपूर तालुक्यात 427 मिलिमीटर(90.87 टक्के),संगमनेर तालुक्यात 309 मिलिमीटर (74.17 टक्के), पाथर्डी तालुक्यात 455मिलिमीटर(82.61टक्के),राहुरी तालुक्यात 440 मिलिमीटर (91.81 टक्के),शेवगाव तालुक्यात 519 मिलिमीटर(92.42 टक्के),राहाता तालुक्यात 533 मिलिमीटर(121.08टक्के), नगर तालुक्यात 500 मिलिमीटर(95.37 टक्के),श्रीगोंदा तालुक्यात 428 मिलिमीटर (95.41 टक्के), नेवासे तालुक्यात 602 मिलिमीटर(113.31टक्के), जामखेड तालुक्यात 630 मिलिमीटर(100.72 टक्के),पारनेर तालुक्यात 458 मिलिमीटर(96.64टक्के) व अकोले तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 760 मिलिमीटर(153.97 टक्के) इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 5 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 100 टक्के पेक्षा जास्त तर 6 तालुक्यांमध्ये 90 टक्केंपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सुरू असलेल्या या दमदार पावसाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील छोटे-मोठे बंधारे,पाझर तलाव भरले आहेत.

भंडारदरा,निळवंडे व मुळा या तीन प्रमुख धरणांमधून सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी नदी पात्रात सोडलेे जात आहे. त्यामुळे नद्यादेखील तुडुंब भरून वाहातांना दिसत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस परतीच्या पावसाला (रिटर्न मान्सून) सुरूवात होणार आहे.

आतापर्यंत गेल्या काही वर्षातील इतिहास पाहिला तर नगर जिल्ह्यात परतीचा पाऊस नेहमीच जोरदार होत आलेला आहे.त्यामुळे परतीच्या पावसाने देखील जोरदार हजेरी लावली तर कदाचित यंदाच्या वर्षी विक्रमी पावसाची नोंद नगर जिल्ह्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.Loading…


Loading…

Loading...