मुंबईतील ते शेतकरी कोण असा प्रश्न मलाही पडला – मुख्यमंत्री

वेबटीम : शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हावार कर्जमाफीला पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे . विशेष म्हणजे या यादीमध्ये मुंबईतील 813 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याचा उल्लेख या आकडेवारीत करण्यात आला आहे. आता मुंबईतले हे शेतकरी नेमके कोणते, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला होता.

आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि  मुंबईत शेतकरी आहेत का असा प्रश्न आपल्यालाही पडल्याच  सांगितल आहे . तसेच  मी तसं अधिकार्‍यांना विचारलंही. मात्र चौकशी करुनच कर्जमाफी दिली जाणार असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.