वेणेखोल ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्‍न अखेर मार्गी

सातारा : अनेक वर्षापासून रखडलेला वेनेखोल ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार शिवेंद्रराजे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या  बैठकीत म्हसवड ता.माण येथे लवकरात लवकर पुनर्वसन करू पुनर्वसन असे आश्‍वांसन प्रशासनाकडून देण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थानी दिली. यावेळी माजी जि. प. सदस्य राजू भोसले, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे आणि ग्रामस्थ  यांची बैठक झाली. यात प्रशासनाकडून वारंवार बैठका घेऊनही पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचा आरोप ग्रामस्थानी केला. त्यावर आमदार शिवेंद्रराजे आक्रमक झाले.

अधिकाऱ्यासमवेत जानेवारी महिन्यात बैठक झाली होती. त्यानंतर 8 महिने प्रशासनाने काहीच न केल्याचे त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच वेनेखोल ग्रामस्थांचे पुनर्वसन लवकरच म्हसवड येथे होईल असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांकडून  विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रकल्पग्रस्तांना  शासकीय सेवेत नोकरी न देता एक रकमी 25 लाख रुपये देण्यात यावे, कोणत्याही परिस्थितीत म्हसवड ता. माण येथे पुनर्वसन झाले पाहिजे, 19 वर्षाची झालेली नुकसान भरपाई प्रति वर्षी तीन लाख देण्यात यावी. जो पर्यंत पुनर्वसन होऊन शेत जमिनीतून उत्पन्न चालू होतं नाही तोपर्यंत उदरनिवाह भत्ता दरमहा 3 हजार प्रमाणे देण्यात यावा.

19 वर्षापासून पुनवर्सन रखडल्याने आमची खाते फोड होऊ शकली नाही त्यामुळे भूमिहीन, बेघर होणार्‍याना 1 एकर जमीन आणि घरासाठी जागा द्यावी, पळशी ता.माण येथे आमची ग्रामपंचायत दाखवून 1 कोटी 23 लाख रुपये खर्च केला आहे, त्यातील सर्व अधिकार्‍यावर कारवाई करण्यात यावी यासह आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी नारायण सपकाळ, खंडूराव सपकाळ, गेनू सपकाळ, बाळकृष्ण जाईगडे, संदीप सपकाळ, विठ्ठल सपकाळ, अमोल सपकाळ, गणपत सपकाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.