गेली २७ वर्षें तुम्ही मूग गिळून गप्प बसून राहिला?

‘रूटस् ऑफ कश्मीर’ ला हायकोर्टाचा सवाल

वेबटीम : १९८९-९० या काळात कश्मीर घाटीत मोठ्या प्रमाणात रक्तपात होऊन सुमारे ७०० कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. त्यावेळी घडलेल्या या हिंसाचार आणि हत्याकांडाची चौकशी करण्याचे आणि दोषींविरुद्ध खटले चालविण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती करणारी याचिका ‘रूटस् ऑफ कश्मीर’ या स्वयंसेवी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून याचिकाकर्त्यांना फटकारले आहे
२७ वर्षांपूर्वी घडलेल्या कश्मिरी पंडितांच्या सामूहिक हत्याकांडाचे चौकशीचे आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट नकार दिला. या हत्यासत्राला बरीच वर्षे लोटली आहेत. त्यामुळे त्याकाळी घडलेल्या लुटालुट, हिंसाचार आणि सामूहिक हत्याकांडासारख्या घटनांचे पुरावे गोळा करणे आता तरी कठीण आहे, असे स्पष्ट मत सरन्यायाधीश जे. एस. खेहर आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले. गेली २७ वर्षें तुम्ही मूग गिळून गप्प बसून राहिलात. या हत्याकांडाचे पुरावे कोठून आणायचे असा सवालही खंडपीठाने केला

You might also like
Comments
Loading...