मंञीमंडाळाच्या आगामी बैठकीत अनुदानाचा प्रश्न निकाली निघणार

निलंगा :  वेतन अनुदानासाठी राज्यभर सुरु असलेल्या तीव्र आंदोलनाची मुख्यमंञ्यांनी दखल घेतली असून विना अनुदानितचे सर्व प्रश्न निकाली निघणार असल्याची माहिती आ.विक्रम काळे यांनी दिली. राज्य सरकारने वेतन अनुदानाचा प्रश्न तत्काळ निकाली काढावे या मागणीसाठी शिक्षकांनी पुकारलेले राज्यभरातील आंदोलन चिघळले असल्याच्या पार्श्वभूमीवर आ.श्रीकांत शिंगाडे व आ.दत्ताञय सावंत यांच्या समवेत आपण बुधवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंञी आशिष शेलार यांची संयुक्तपणे भेट घेवून वेतन अनुदान देण्याची त्यांच्याकडे विनंती केली.

राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये विना अनुदान शाळांच्या प्रश्नासाठी हजारो शिक्षक आंदोलन करत असल्याचे त्यांच्या निर्दशनास आणून दिले.वसमत(जि.हिंगोली) येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे.या आंदोलनातील काही आंदोलन कर्त्या शिक्षकांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.अनुदानाच्या मागणीसाठी राज्यभर पुकारलेले हे आंदोलन चिघळल्याने आता परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे.या पार्श्वभूमीवर आम्ही मुख्यमंत्री व शिक्षणमंञी यांना विना अनुदान शाळांचे सर्व प्रश्न निकाली काढण्याची विनंती केली.आगामी मंञीमंडळाच्या बैठकीत विना अनुदानितचे सर्व विषय ठेवण्याची सूचना शिक्षणमंञ्यांना केली.आचारसंहिता लागण्याच्या आत विना अनुदानितचे सर्व प्रश्न निकाली लागतील असे सांगून आम्हाला आश्वासित केल्याचे आ.विक्रम काळे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले.

Loading...

दरम्यान ५ आँगस्ट पासून राज्यभरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर अनुदानाच्या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरु आहे.पण त्याची शासनस्तरावर दखल न घेण्यात आल्यामुळे स्वातंत्र्य दिनी १५ आँगस्ट रोजी आत्मक्लेश आंदोलन छेडण्यात येणार आहे.या दिवशी राज्यभरातील हजारो शिक्षक पायात चप्पल न घालता आणवानी चालणार असल्याचे कायम विना अनुदान कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.त्याचबरोबर १६ आँगस्ट पासून राज्यभर बेमुदत शाळा आंदोलन छेडण्यात येणार असल्याने राज्यभर शाळा बेमुदत बंद राहणार आहेत.त्याचबरोबर राज्यभर शिक्षण उपसंचालक कार्यालयावर आपल्या कुटूंबियासह शिक्षकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंञी विजय नवल पाटील व मुख्याध्यापक संघाचे राज्याचे अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी या संपाला पूर्ण पाठींबा दिला असून राज्य सरकारने शिक्षकांना वेतन अनुदान द्यावे अशी मागणी केली आहे.मागील अनेक वर्षापासून विविध आंदोलने करुनही मागणी मान्य होत नसून आगामी विधानसभा निवडाणूकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने शिक्षक चिडल्याने हे आंदोलन चिघळले आहे.मुख्यमंत्री व शिक्षणमंञी यांनी मंञिमंडळाच्या आगामी बैठकीत अनुदानाचा प्रश्न निकाली काढण्याचा शब्द दिला असला तरी शिक्षक बांधवांनी राज्यभर चालू असलेल्या आंदोलनाच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी होवून सरकारला आपली एकजूट दाखवून द्यावे असे आवाहन विक्रम काळे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी