ब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या

टीम महाराष्ट्र देशा – आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज, मुस्लिम समाज आक्रमक झाला असताना ब्राह्मण समाजाने देखील आरक्षणाची मागणी केल्यानं निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.येत्या 22 जानेवारीला आझाद मैदानावर ब्राह्मण समाज धरणं आंदोलन करणार आहे.

बहूभाषिक ब्राह्मण महासंघ, ब्राह्मण जागृती सेवा संघ, परशुराम सेवा संघ, पेशवा युवा संघटना ,ब्राह्मण महिला मंच, अ.भा.पेशवा संघटना, विश्व ब्राह्मण संघ, मासिक ब्राहण संघटन, आम्ही सारे ब्राह्मण महाराष्ट्रातील या प्रमुख संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

दरम्यान,ज्या समाजाला आतापर्यंत तथाकथित उच्चभ्रू म्हणून संबांधले जाते, ज्या शेष वर्गात माधुकरीवर उदरनिर्वाह करणारा गरीब ब्राह्मण, कायस्थ, सारस्वत व वैश्य समाज आहे. या वर्गासाठी आता ३३ टक्के आरक्षण राखून ठेवावे, अशी मागणी निवृत्त न्यायमूर्ती राजन कोचर यांनी केली होती.

नेमक्या कांय आहेत ब्राह्मण समाजाच्या मागण्या

  • – ब्राह्मण समाजातील आर्थिक मागास घटकातील तरुणांना शैक्षणिक व व्यावसायिक तसेच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी.
  • या महामंडळासाठी ५०० कोटींची तरतूद करावी.
  • ब्राह्मण पुरोहितांना मासिक ५ हजार रुपये मानधन देऊन त्यांची विविध मंदिरांत नियुक्ती करावी.
  • ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह स्थापन करावे.
  • केजी ते पीजीपर्यंतचे सर्व शिक्षण मोफत करावे.
  • शिक्षण-नोकरी-राजकीय क्षेत्रांत अनारक्षित विभागात आरक्षित उमेदवारांना अर्ज करण्यास मज्जाव करावा.
  • ब्राह्मण समाजातील सेवकांना मिळालेल्या इनाम जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ संवर्गात टाकाव्यात व त्यांचा मालकी हक्क कायम करावा.
  • लंडन येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवासस्थान राहिलेली जागा सरकारने विकत घेऊन स्मारक उभारावे.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर पूर्ण करावे.