प्रश्न विचारला की माध्यमांवर हल्ले ! अशाने पूजा चव्हाणला न्याय मिळणार का ? : फडणवीस

devendra vs uddhav

मुंबई : राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड हे पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, आज ते समोर आले. यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते. बेकाबू गर्दीवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली.पोलिसांचे आदेश झुगारत ५० जणांची परवानगी असताना हजारो समर्थकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. शिवसेनेचे कार्यकर्ते नेते हेच या गर्दीत मोठ्या प्रमाणावर होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला शिवसेनेच्याच मंत्र्याने केराची टोपली दाखवल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. याच पार्श्वभूमीव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकार वर टीका केलेली आहे. त्यांनी ट्वीत करून सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि, ‘मा. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्याकडून असा प्रतिसाद! पोलिस आणि मिडियांच्या वाहनांची तोडफोड! प्रश्न विचारला की माध्यमांवर हल्ले! अशाने पूजा चव्हाणला न्याय मिळणार का ?’ असा संतप्त सवाल यावेळी त्यांनी विचारला आहे.

मात्र, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नियम मोडणाऱ्यांना फटकारलं आहे. ‘कोव्हीड संदर्भातील नियम जे सर्वांसाठी सारखेच आहेत. त्यामुळे पोहरादेवीतील उपस्थितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी,’ असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या