महात्मा फुलेंच पागोटे वापराव हाच हेतू होता ; शरद पवारांचं स्पष्टीकरण

shrad pawar pagadi

पुणे : पुण्यातील कार्यक्रमात पेशवेकालीन पगडीने स्वागताची परंपरा आहे. मात्र शरद पवारांनी त्याला फाटा देत, यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फुले पगडीनेच स्वागत करावे असं म्हंटलं होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत असून शरद पवार यांच्यावर टीका देखील केली जात आहे.

दरम्यान शरद पवार म्हणाले, मध्यंतरी मी पागोट्या बाबत काही बोललो त्याची चर्चा देशात होतेय, ज्यांना आदर्श मानतो त्या महात्मा फुलेच पागोटे वापराव हाच हेतू होता पण त्या गोष्टीची खूप चर्चा झाली बरीच मंडळी दुखावली. मात्र माझा यात दुसरा काही हेतू नव्हता.

पुण्याचा मला अभिमान आहे इथे वाढलो शिकलो. पुणे आता बदलत आहे ही चांगली बाब पुण्यातल्या न्यु इंग्लिश स्कुल मध्ये मुलींना ८० वर्षांनी का होईना प्रवेश मिळतो. याचा अर्थ पुणे बदलतय आणि मुलींना शिक्षण हा महात्मा फुलेंचा दृष्टिकोन होता. तसेच मी कुणा बाबत वैयक्तिक किंवा कुठल्या समूहाबाबत हे वक्तव्य केलं नव्हतं. असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. ते आज पुण्यात बोलत होते.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...