राज्य सरकारने लादलेल्या निर्बंधांच्या विरोधात पुणे व्यापारी महासंघाने केले घंटानाद आंदोलन

पुणे व्यापारी

पुणे : राज्य शासनाने सोमवारी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ‘ब्रेक द चेन’ची नवीन नियमावली जाहीर केली. त्यामध्ये पुणे जिल्ह्यासह १४ जिल्ह्यांमध्ये स्तर तीनचे नियम कायम ठेवले आहे. पण मुंबईतील दुकाने, कार्यालये आठवड्यातील सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंतची परावनगी दिली आहे. शासनाच्या या दुटप्पी भूमिकेचा पुण्यात मोठ्याप्रमाणात विरोध होत आहे.

राज्य सरकारने लादलेल्या वेळेच्या बंधनांविरोधात पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने आज शहरातील विविध ठिकाणी घंटानाद करीत आंदोलन करण्यात आले. शहरातील व्यापारी यावेळी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग झाले होते. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, फर्गसन रस्ता, गणेश पेठ, बोहरी आळी, शिवाजी रस्ता, टिंबर मार्केट, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता अशा सर्व प्रमुख रस्त्यांवर उतरत थाळी, घंटा वाजवीत व्यापा-यांनी सरकारचा  निषेध केला.

दुस-या लाटेचा धोका लक्षात राज्य सरकारने पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंखेरीज बाजारपेठेतील बाकी सर्व व्यवसायांवर वेळेची बंधने आणली आहेत. मात्र आता चार महिने उलटून गेले तरीही यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिथिलता आलेली नाही. एकीकडे शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना हे निर्बंध लादले जात असल्याने व्यापारी वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे, त्यामुळे सरकार विरोधात पुण्यातील व्यापा-यांनी रस्त्यावर उतरत घंटानाद आंदोलन केले.

महत्त्वाच्या बातम्या