जन कल्याण समिती करणार कोव्हिड रुग्ण आणि नातेवाईकांचे समुपदेशन

औरंंगाबाद : कोव्हिड-१९ च्या वाढत्या संसर्गामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगण्याचे परिमाणच बदलून गेले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे शारिरीक, सामाजिक आणि आर्थिक बदल घडत असल्याने अनेकांचे मानसिक स्वास्थ खालावले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात कोव्हिडग्रस्त रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे मनोबल वाढविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जन कल्याण समितीच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात आपत्ती विमोचन समिती गठीत करण्यात आली आहे. आपत्ती विमोचन समितीचे सदस्य कोव्हिडग्रस्त रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधुन त्यांचे समुपदेशन करणार असल्याची माहिती शहर संघचालक कन्हैयालाल शहा यांनी दिली आहे.

कोरोनाच्या बदलत्या काळात मानसिक स्वास्थ चांगले राहण्याची गरज असून त्याला एक चांगल्या मैत्रीची गरज आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांना मानसिक पाठबळ देण्यासाठी आमची  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जन कल्याण समितीच्या वतीने ‘संवाद मित्र’ टीम तयार केली आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे मनोबल वाढविण्यासाठी ही संवाद टिम त्यांना आवश्यक ती मदत करणार आहे. या समितीने आतापर्यंत अनेकांना मदतीचा हात दिला असल्याचे कन्हैयालाल शहा यांनी सांगितले.  शहर संघचालक कन्हैयालाल शहा, जनकल्याण समितीचे अध्यक्ष गोवर्धन अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशन करण्याची विनामुल्य सेवा सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, गेले वर्षभर बाहेरून काहीही विकत न आणता (अगदी भाजीपाला देखील) तसेच कोणाशीही संपर्क न ठेवलेल्या एका ज्येष्ठ दांम्पत्याला आलेल्या मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी समितीच्या सदस्यांनी मदत केली. त्यामुळे हे ज्येष्ठ दांम्पत्य आता परिस्थितीशी जुळवून घेत नव्या उमेदीने आयुष्य जगत आहे. तसेच एका ३५ वर्षीय युवकाला देखील संवाद मित्र टिमने मदत केल्यामुळे तो तरूण देखील आज तणावमुक्त होवून नवीन आयुष्य जगत असल्याचे शहर संघचालक कन्हैयालाल शहा यांनी सांगितले. समुपदेशन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही. या सेवेचा लाभ घेण्यासाठी गरजुंनी संपर्वâ साधावा असे आवाहन शहर संघचालक कन्हैयालाल शहा, जनकल्याण समितीचे अध्यक्ष गोवर्धन अग्रवाल यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या