शेलारांचा ‘तो’ प्रश्न बालिश; ATS वर शंका घेणाऱ्ऱ्या राजकारण्यांपासुन जनतेने सतर्क राहावे – मिटकरी

amol mitkari vs ashish shelar

पुणे : दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 2 पाकिस्तानी नागरिकांसह एकंदर सहा दहशतवाद्यांना यांसदर्भात अटक केली. दिल्लीमध्ये काल 6 दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याची माहीती मिळाली अन् राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तर भाजपकडून यावरूनच तीव्र स्वरुपात टीका केली जात आहे.

राज्यात दहशतवादी मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचं एटीएस एवढा वेळ झोपलं होतं काय? असा संतप्त सवाल भाजप नेते आणि आमदार ऍड. आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शरसंधान साधलं.

आशिष शेलार यांच्या या सवालावरून आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे. ‘आशिष शेलारजी आपण व आपला पक्ष न झोपता 24 तास राजकारण करताना, देशाच्या सुरक्षेच्या विषयात सातत्याने कसे राजकारण करता हे आजच्या आपल्या बालिश प्रश्नावरून लक्षात येतं. मुंबई ATS वर शंका घेणाऱ्ऱ्या अशा राजकारण्यांपासुन जनतेने सतर्क राहावे!’ असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले होते ?

‘या दहशतवाद्यांचे प्रशिक्षण पाकिस्तानात झाले आहे व दाऊदचा भाऊ अनिस अहमद त्यांना पैसा पुरवत होता असं समोर आलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकार विशिष्ट वर्गासाठी मवाळ भूमिका तर नाही घेत आहे ना?’ अशी शंका आशिष शेलार यांनी उपस्थित केली. तसेच, या दहशतवाद्यांची माहिती पोलिसांकडे तसेच गृहमंत्र्यांकडे होती का, होती तर एवढा वेळ ते काय करत होते? असा सवाल देखील आशिष शेलार यांनी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या