मराठा आंदोलन : कुर्डूवाडीत आंदोलकांनी बोकडाला बनवले मुख्यमंत्री

कुर्डूवाडी प्रतिनीधी/ हर्शल बगल : सकल मराठा क्रांती मोर्चा माढा तालुक्याच्या वतीने कुर्डूवाडी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन बोकडाची संभळ वाद्य वाजवत शहरातील प्रमुख रस्त्यावरुन मिरवणुक काढली. बोकडाला मुख्यमंत्री असे नाव देण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा समाजाच्या तीव्र घोषणाबाजी सुरु होती.

Loading...

सकाळी दहा वाजता शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन मराठा आंदोलकांचा ताफा गांधी चौक – मिठाई गल्ली – लक्ष्मी टाँकिज – नगरपरिषद समोरुन – पटेल चौक – म्हसोबा पार – पोस्ट आँफिस रोडवरुन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात काढण्यात आला. यावेळी बोकडाची प्रतिकात्मक संभळ वाद्य वाजवत यात्रा काढुन सरकार विरोधी घोषणा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आल्या. यावेळी मराठा समाज मोठ्या संख्येंने ऊपस्थित होता. अनेकांच्या हातात भगवे झेंडे, संभळवाद्य, तुनतुने घेऊन प्रचंड मोठी प्रभात यात्रा काढण्यात आली. तुमचं आमचं नातं काय ..जय जिजाऊ जय शिवराय, मराठ्यांना आरक्षण मिळालचं पाहिजे, कोण म्हणतं देत नाही …घेतल्याशिवाय राहत नाही, या फढणवीस सरकारचं कारायचं काय? खाली मुडकं वर पाय, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

या यात्रेचे नियोजन सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी केले होते. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जागरण गोंधळाचे नियोजन करणार असल्याचे सागिंतले.

मराठा समाज आक्रमक ! आता मूक नव्हे ‘गनिमी कावा’

जागे व्हा जागे व्हा ! दिलीप कांबळे जागे व्हा ; ‘मंत्र्यांच्या कार्यलयासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी’

ब्रेकिंग : अन्यथा १ ऑगस्टला जेलभरो आंदोलन; मराठा आंदोलकांचा सरकारला निर्वाणीचा इशाराLoading…


Loading…

Loading...